वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल यांचे निधन..... उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
शिवाजीदादा हे वेंगुर्लातील जेष्ठ नेते होते. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांचे ते अतिशय जवळचे मित्र होते. तर विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ते मार्गदर्शक होते. वयाच्या २६ व्या वर्षी ते वेंगुर्ला नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यावेळी स्वच्छता अभियानात नगरपालिकेला पुरस्कारही मिळाला होता.
राज्य सरकारचा कृषिभूषण, कृषिरत्न असे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ते १५ ते २० वर्षे सिनेट मेम्बर होते. तर वेंगुर्ल्यातील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या स्थानिक संचालक मंडळाचे ते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतण्या, भावजया, नातवंडे असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments