"पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न"
नवप्रभात NEWS / कुडाळ
एस्.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व कै.सौ.एस्.आर् .पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा गुणगौरव समारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना या यशापर्यंत पोहोचवणाऱ्या ,धीर देणाऱ्या, मदतीचा हात देणाऱ्या पालकांचे विशेष अभिनंदन .मार्ग दाखवणाऱ्या शिक्षकांच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहो अशी कामना व्यक्त करतो .वाचन संस्कृती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तुमचे विचार सकारात्मक व विधेयक असले पाहिजेत; असा अनमोल संदेश कार्यक्रमाचे विशेष अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते ते कै. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै.श्री रामचंद्र निळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिक समारंभ .या ठाकूर कुटुंबीयांच्या स्मरणार्थ प्रशालेतील विविध परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कै.सौ.सुहासिनी रामचंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे भाषण प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. आमची संस्था दरवर्षी सव्वा लाख रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना प्रदान करते ते विविध दानशूर व्यक्तिमत्वे व प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांमुळे असे प्रतिपादन संस्था सदस्य राजेश सामंत यांनी आपल्या भाषणातून केले .पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांची एकाग्रता हा त्यांच्या यशाचा खरा मार्ग आहे असे संस्था सचिव विजय ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाले.
शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव ,संवेदनशील ,उत्तम मार्गदर्शक, परिस्थितीची जाणीव असणारे व्यक्तिमत्व अशा शब्दांत शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर यांनी कार्यक्रमाचे विशेष अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांचा परिचय करून दिला. गुलाब पुष्प देऊन
मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, संस्था व प्रशालेच्या वतीने शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींचा सत्कार संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके पुढील प्रमाणे देण्यात आली------' कै. सौ सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृती पारितोषिके- इयत्ता पाचवी ते नववी मधील 2025- 26 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी 1) इयत्ता पाचवी- मीरा महादेव सामंत 2)इयत्ता सहावी- विरा वरद रेवंडकर 3)इयत्ता सातवी -भक्ती योगेश तेली कोचरेकर 4)इयत्ता आठवी- आर्यन अनिल परब 5) इयत्ता नववी -मिहीर विजय मेस्त्री.
कै. श्री.रामचंद्र निळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिके---- सन 2025 -26 मध्ये इयत्ता दहावी ,अकरावी -विज्ञान, वाणिज्य ,कला,बारावी- विज्ञान ,वाणिज्य ,कला प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी पुढील प्रमाणे इयत्ता- दहावी दिया निलेश सामंत, इयत्ता- अकरावी -विज्ञान दर्शन सुंदर सामंत ,इयत्ता अकरावी- वाणिज्य मनस्वी दादू रावले ,इयत्ता अकरावी कला -भाग्यश्री जनार्दन माधव ,इयत्ता बारावी- विज्ञान अर्पिता अमेय सामंत, इयत्ता बारावी वाणिज्य- अथर्व उत्तम पाटकर ,इयत्ता बारावी -कला प्रियांका गोविंद आरोलकर .
तसेच सन 2025 -26 इयत्ता दहावी मधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे---- प्रथम क्रमांक- दिया निलेश सामंत, द्वितीय क्रमांक -शिवानी मंगेश सर्वेकर ,तृतीय क्रमांक- सौमित्र सुधीर मळेकर, तृतीय क्रमांक- शुभंकर संदेश नाईक, तसेच 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी--- वैभवी नारायण केळुसकर,स्वयम अमृत महाडिक, वैदेही मंगेश अवसरे ,वेदिका सतीश नार्वेकर, बाळकृष्ण प्रसाद रावले ,सिया सतीश मयेकर, प्राजक्ता प्रदीप दाभोलकर ,चैतन्या राजेश कोळंबकर. एन्. एम्. एम्. एस्. परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे महेश्वरी गिरीप्रसाद राऊळ, हरी विकास नार्वेकर, वेदांती लक्ष्मण दाभोलकर, दीक्षांत उमेश कोरगावकर ,इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी( उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती- परीक्षा) प्रथम क्रमांक मीरा महादेव सामंत, द्वितीय क्रमांक स्पृहा संदेश नाईक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती -परीक्षा'( पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) प्रथम क्रमांक आर्यन अनिल परब ,द्वितीय क्रमांक महेश्वरी गिरीप्रसाद राऊळ. सन 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस्. सी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक विज्ञान शाखा- प्रथम क्रमांक अर्पिता अमेय सामंत, द्वितीय क्रमांक दीक्षा शंकर परब, तृतीय क्रमांक शाल्मली शंकर घोगळे ,वाणिज्य शाखा- प्रथम क्रमांक अथर्व उत्तम पाटकर ,द्वितीय क्रमांक रिया राजन पाटकर, तृतीय क्रमांक वैभव वासुदेव वझरकर ,कला शाखा- प्रथम क्रमांक प्रियांका गोविंद आरोलकर, द्वितीय क्रमांक वेदश्री ज्ञानेश्वर परब, तृतीय क्रमांक लाडू मधुकर पाटील या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन प्रशाला व संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.
व्यासपीठावर संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर सामंत ,संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर,संस्था सचिव विजय ठाकूर,राजेश सामंत, नारायण तळावडेकर, महेश ठाकूर प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर,गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, सूत्रसंचालन जान्हवी पडते ,पारितोषिकांचे वाचन नंदिनी बुरुड आणि आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.
Post a Comment
0 Comments