Type Here to Get Search Results !

दाभोली हळदणवाडी नारायण मंदिरनजीकच्या अपघातात वेंगुर्ल्यातील युवक जागीच ठार

दाभोली हळदणवाडी नारायण मंदिरनजीकच्या अपघातात वेंगुर्ल्यातील युवक जागीच ठार

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले दाभोली मार्गे कुडाळ रस्त्यावर दाभोली हळदणकरवाडी येथील नारायण मंदिरजवळील वळणावर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप त (MH-07-0323) व आय प्रेस ई बाईक (MH07-4377) यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा युवक वेंगुर्ले सुंदरभाटले येथील रहिवासी असल्याची ओळख घटनास्थळी पटविण्यात आली होती.
    या अपघातातील बोलेरो पिकअप हा टेम्पो दाभोलीच्या दिशेने येत होता तर आय प्रेस ही इलेक्ट्रीक दुचाकी वेतोरेच्या दिशेने जात होती. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वळणावरील उतारावर हा अपघात झाला. या अपघाताचे वृत्त समजताच हळदणकरवाडी येथील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर, दादा गोवेकर, वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, दिलीप बांदवलकर, मनोज कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोशी, उमेश जोशी, प्रकाश बांदवलकर, गणेश हळदणकर, सिद्धेश प्रभू, माजी सरपंच मनाली हळदणकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार आदी ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनची संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, हवालदार भगवान चव्हाण, बंटी पालकर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. 102 ॲम्बुलन्सने युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी युवकाच्या नातेवाईकांना सदर घटनेची खबर दिली असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments