नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ला सभापती शंकर घारे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि माजी शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी प्रतिष्ठेची केलेली लढत; भाजपचे उमेदवार जयवंत तुळसकर यांचा पराभव
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड घडली. भाजपचे उमेदवार जयवंत तुळसकर यांचा पराभव करत अपक्ष ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. नारायण कुंभार यांची तुळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.
या निवडणुकीला वेंगुर्ला सभापती शंकर घारे आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत मानले जात होते. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने नारायण कुंभार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
त्यांच्या निवडीमुळे तुळस गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री. नारायण कुंभार यांनी सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देत सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीमुळे गावातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, "तुळसच्या विकासाला नवी दिशा मिळेल," अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी माजी सरपंच विजय रेडकर, श्रीनिवास मराठे, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, विनय गोरे, वैभव होंडावडेकर, विलास नार्वेकर, बाबा राऊळ, पिंट्या राऊळ, अवधूत मराठे, उमेश कुंभार, शेखर कुंभार, दिनेश कुंभार, भाई कुंभार, विलास कुंभार,राजेश भनगे,सुनील कोरगावकर महेश बारागडे, नितीन कोचरेकर, नंदू बेहरे, विकी ठुबरे, किशोर कुंभार, सिद्धेश शेटकर व तुळस ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments