Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्गचे सुपुत्र विश्वनाथ कांबळी यांची उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक अधिकारी पदी निवड.....

सिंधुदुर्गचे सुपुत्र विश्वनाथ कांबळी यांची उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक अधिकारी पदी निवड.....

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्ग येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ देवदास कांबळी यांची उच्च न्यायालय, मुंबई येथे विवाह समुपदेशक, वर्ग-एक, राजपत्रित अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.

श्री.कांबळी हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वायंगणी गावचे सुपुत्र असुन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) व एलएलबी (LLB) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

नियुक्तीपूर्वी त्यांनी कुडाळ पोलीस स्टेशन येथे महिला व बालकांसाठी विशेष सहाय्यता कक्ष व महिला समुपदेशन केंद्रात समुपदेशक म्हणून, तसेच उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथेही समुपदेशक म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून काम करताना बालकांचे हक्क, काळजी व संरक्षणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. बालकांचे पुनर्वसन, समुपदेशन, बालगृहांचे सक्षमीकरण व बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरले. जिल्ह्यातील अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी तत्परतेने भूमिका बजावली होती.

त्यांच्या या नव्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा गौरव झाला आहे. उच्च न्यायालयातील विवाह समुपदेशक या महत्त्वाच्या पदावर त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळणार आहे.

श्री. कांबळी यांच्या पदोन्नतीबद्दल महिला व बालविकास सिंधुदुर्ग विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments