संविधान हत्या दिवसाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले प्रभाकर मराठे यांचा सन्मान....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
देशात ५१ वर्षापुर्वी लादण्यात आलेली आणीबाणी म्हणजे हुकुमशाही राजकीय प्रवास आणि स्वातंत्र्य्याची गळचेपी होती . भारतीय संविधानाच्या तरतुदीचा दुरूपयोग करण्यात आला होता . त्यामुळे या परिस्थिती विरोधात त्यावेळी उभारलेला लढा म्हणजे दुसरे स्वातंत्र्य युद्ध होते . आणि या अनुशंगाने त्यावेळचा १४ महीन्यांचा तुरुंगवास भोगलेले वेंगुर्ले भटवाडी येथील रा.स्वं.संघाचे प्रभाकर मराठे यांचा सन्मान प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले .
तत्कालीन काँग्रेस शासीत केंद्र सरकारने २५ जुन १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती . २१ मार्च १९७७ पर्यंत २२ महीने ही आणीबाणी लागु होती .या तात्कालिन सरकारच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्य्यावर घाला पडला होता .राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , अन्य पक्ष व सामाजिक संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता . याचाच परिपाक म्हणुन देशवासियांना कोणत्याही क्षणी अटक करण्यास सुरुवात झाली होती .यात सिंधुदुर्गातील नागरीकांचा सामावेश होता .
तात्कालिन सरकारच्या कार्यपद्धतीला २५ जुन रोजी ५१ वर्षे पुर्ण झाल्याने भाजपा च्या वतीने हा दिवस " संविधान हत्या दिवस " म्हणून पाळण्यात येतो . या निमीत्ताने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी रा.स्व.संघाचे कार्यकर्ते प्रभाकर मराठे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी भाजपाचे नरहरी खानोलकर , रा.स्वं .संघाचे दिना आचार्य , यशवंत कुडपकर , मधुकर जोशी , विलास पालव , तांडेल .उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments