अरविंद रमाकांत प्रभू मित्र मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न....
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्तरावरील समाजरत्न पुरस्कार विजेते मा.श्री.अरविंद रमाकांत प्रभू ,वरिष्ठ उपाध्यक्ष पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि संचालन अँलेंबिक फार्मासिटिकल लिमिटेडचे मा.डॉ. सचिन घोसाळकर,सौ सीमा घोसाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.स्वाती रवींद्र वालावलकर मा.श्री. मनोहर पावस्कर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. के.डी खरबडे,श्री सूर्यकांत घाडी कु. वैभवी घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.प्रास्ताविक श्री. के.डी खरबडे सर यांनी केले.यावेळी माननीय श्री अरविंद प्रभू, डॉ.सचिन घोसाळकर सर,सौ. सीमा घोसाळकर,सौ स्वाती वालावलकर यांचा शाल श्रीफळ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.कुमारी वैभवी सूर्यकांत लाड हिने शारीरिक आजारावर मात करत दहावीच्या परीक्षेत 95% गुण मिळवल्याबद्दल तिला शैक्षणिक साहित्य देऊन तिचा खास सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सर्वेसर्वा माननीय श्री अरविंद प्रभू यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील छोट्या मोठ्या अनुभवांची शिदोरी सांगत हसत खेळत उतरोत्तर प्रगती करण्याचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा. डॉ. सचिन गोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले तसेच जिद्द व चिकाटी याच्या जोरावर यश मिळवा असा बहुमोल संदेश दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ. स्वाती वालावलकर यांनी अरविंद प्रभू यांच्या कार्याचे कौतुक केले समाजा प्रती असलेली त्यांची भूमिका समाजा प्रती असलेले दातृत्व याच्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. त्याच बरोबर अरविंद प्रभू यांच्या या शैक्षणिक साहित्य वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुष्कळ विध्यार्थ्यांना फायदा होत आहे आणि पालकांनाही सहाय्य लाभत आहे.याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश पेडणेकर यांनी तर आभार श्री. प्रशांत सावंत यांनी मानले.
Post a Comment
0 Comments