Type Here to Get Search Results !

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी


बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक, शाश्वत विकासाचं स्वप्न आणि रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा सुज्ञ राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयातील वनस्पती विभाग प्रमुख डॉक्टर धनश्री पाटील होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे होते.
         या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. सुदाम माने यांनी शुभेच्छा दिल्या
          या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे यांनी यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 'बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी विविध वस्तीगृहे काढली, त्यांना 50 टक्के आरक्षण दिले. आपल्या राज्यात शिक्षण सक्तीचे करणारे ते एकमेव राजा होते. त्यांच्या विचारांवर आपण मार्गक्रमण करायला हवे.' असे प्रतिपादन केले
        त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा वनस्पती विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी इको टुरिझम च्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमा बद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की, कोकणातील निसर्ग संपन्न सौंदर्य हे तिथल्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव करून देणारा हा अभ्यासक्रम गेली तीन वर्ष महाविद्यालयांमध्ये चालू आहे. या अभ्यासक्रमातून पर्यावरण पूरक अनेक उपक्रम राबवले जातात आणि समुद्रकिनारा, कांदळवन, सडे ,इथली महत्त्वपूर्ण जैवविविधता इथल्या महत्त्वाच्या आणि दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास पक्षी, प्राणी यांचे महत्त्व जाणून त्यांचे शाश्वत संवर्धन कसे करावे याविषयी विविध कौशल्य विकसित करण्याचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमातून होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील विविध भागातून इथल्या कांदळवन तसेच सुरंगी सारख्या सुगंधी वनस्पती यांचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्रोक्त अभ्यासपूर्ण शृंखला तयार करण्यात आली आहे. यावर्षी या अभ्यासक्रमामध्ये ऑनलाईन, ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून सिंधुदुर्गातील पर्यटन हे पर्यावरण पूरक व शाश्वत सामाजिक आर्थिक विकासासाठी कसे नियोजित करण्यात येईल याचा अभ्यास होईल. तसेच त्यापुढे म्हणाल्या की, महाविद्यालयाचे प्राचार्य धनराज गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एक जुलैपासून या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. 
या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.धनश्री पाटील , वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख आणि कोर्सचे प्रमुख प्राध्यापक नंदगिरीकर आहेत.
      या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सदाशिव चुकेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments