Type Here to Get Search Results !

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयापर्यंत बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी वेंगुर्ला आगार व्यवस्थापकास निवेदन दिले...


बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयापर्यंत बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी वेंगुर्ला आगार व्यवस्थापकास निवेदन दिले...

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.धनराज गोस्वामी आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री गावडे साहेब यांना आंरोदा, रेडी ते खर्डेकर महाविद्यालय आणि म्हापण,केळुस मार्गे वेंगुर्ला ते खर्डेकर महाविद्यालय पर्यंत परत सुरु करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले.
 बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय हे वेंगुर्ला तालुक्यात अनेक दशकापासून जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असते. विशेषता वेंगुर्ला तालुक्यातील आरोंदा, रेड्डी, शिरोडा, तिरोडा, सोनसुरे, आरवली, असोली आणि मोचेमाड तसेच म्हापण, केळुस, तेंडोली, खानोली, दाबोली आवेरे या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. महाविद्यालयात येण्यासाठी हे विद्यार्थी पूर्णपणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेवरती अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात असे निदर्शनास आले की, वेंगुर्ला आगाराच्या काही बसेस ज्या आरोंदा, रेड्डी, शिरोडा ते खर्डेकर महाविद्यालय आणि म्हापण, केळुस, तेंडोली,आंदुर्ले ते महाविद्यालय येणाऱ्या बसेस ह्या बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना एस.टी स्टँड पासून ते महाविद्यालयापर्यंत साधारण तीन किलोमीटर पायी चालत यावे लागते त्यामुळे विद्यार्थी वेळेत तासिकांना हजर राहू शकत नाहीत. महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा विचार करून महाविद्यालयाचे प्राचार्या प्रोफेसर डॉ.धनराज गोस्वामी, श्री प्रसन्ना देसाई आणि संस्था प्रतिनिधी श्री सुरेंद्र चव्हाण यांनी श्री नवज्योत गावडे आगार व्यवस्थापक वेंगुर्ला यांना दोन्ही मार्गावरती बस सेवा पूर्वरत करण्याचे निवेदन दिले यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी.जी. गायकवाड, प्रा. डॉ.वसंत पाटोळे, प्रा. बी.एम. भैरट उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments