Type Here to Get Search Results !

“पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एन् .एम् .एम्.एस्. शिष्यवृत्ती “


“पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एन् .एम् .एम्.एस्. शिष्यवृत्ती “

नवप्रभात NEWS / कुडाळ 

एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस्.एल्.देसाई विद्यालय व कै.सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सन 2025 -26 मध्ये घेण्यात आलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी म्हणजेच एन् .ए्म्. एम् .एस्. शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे .
या एन्.एम्.एम्. एस्. परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या 51 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 4 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे .कु.वेदांती लक्ष्मण दाभोलकर S.C. प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम ,कु.दीक्षांत उमेश कोरगांवकर S.C. प्रवर्गातून जिल्ह्यात चतुर्थ ,कु.हरी विकास नार्वेकर O.B.C.प्रवर्गातून जिल्ह्यात सहावा तर कु.माहेश्वरी गिरीप्रसाद राऊळ GEN प्रवर्गातून जिल्ह्यात 35 वी येण्याचा बहुमान मिळविला.
उपक्रम प्रमुख म्हणून विनायक कांबळे ,नंदिनी बुरुड आणि मार्गदर्शक शिक्षक म्हणून अंकिता मोडक ,तनुजा कोळंबकर ,सिद्धी चव्हाण ,मारुती सांगळे यांनी काम पाहिले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक तसेच संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत ,कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर ,सचिव विजय ठाकूर ,खजिनदार दीपक पाटकर ,अवधूत रेगे, राजेश सामंत,सुधीर मळेकर , नारायण तळवडेकर या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. सर्व स्तरातून शाळा, विद्यार्थी,शिक्षक व पालक यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments