माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेतोरे येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद....आरोग्य शिबिरात मोफत औषधाचे वाटप
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
श्री देवी सातरी मित्रमंडळ, वेतोरे यांच्या वतीने साई योगेश्वरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. माजी मुख्यमंत्री मा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिराला वेतोरे पंचक्रोशी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन भाजपा चे ज्येष्ठ नेते शरद चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक , वेतोरे सरपंच प्राची नाईक , पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , प्रवासी संघटनेचे नेते राधाकृष्ण वेतोरकर , हर्षद राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई म्हणाले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येक नागरिकाला वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. माजी मुख्यमंत्री , विद्यमान खासदार मा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणे ही खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसाची भेट आहे,” असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहीती देण्यात आली .
या आरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , सिंधुदुर्ग चे डॉ. गोपाल गोटे व डॉ. अपर्णा चिपळूणकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. सुयोग वाकुडे (अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग), डॉ. सुनिल (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग), डॉ. भावनेश चव्हाण (दंतचिकित्सा विभाग) यांच्यासह डॉ. राजेश्वर उबाळे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. तन्वी दि. गोडकर (दंत तज्ञ) तसेच डाॅ. गद्रे नेत्र रुग्णालय व लेसर सेंटर चे नेत्र तज्ञ डाॅ.अनिरुद्ध तेली, नेत्र चिकित्सक उदय दाभोलकर यांनी सेवा बजावली.
तसेच श्री. आसीम सय्यद (समाजसेवा अधीक्षक), श्रीम. गौरी दळवी (एम.सी.सी.ओ.), श्रीम. चिन्मयी कामत (परिचर) आणि श्री. बाबू हरमलकर (आरोग्य मित्र) यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.तसेच फार्मसीस्ट म्हणून सौ. पल्लवी घोगळे हीने काम पाहीले .
या आरोग्य शिबिरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदाब, मधुमेह, वजन, हृदयाचे ठोके आदी प्राथमिक तपासण्या करून आवश्यक त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री देवी सातरी मित्रमंडळाचे दिपक नाईक, प्रशांत नाईक, सुधिर गावडे , अजित नाईक , विरोचन धुरी या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक व प्रभावी ठरला.
यावेळी या शिबिराला नगरसेवक रविंद्र शिरसाठ , पालकरवाडी बुथ प्रमुख आबा येरम , भाऊ गावडे, ग्रा.पं.सदस्य साक्षी राऊळ , विकास अणसूरकर यांनी भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जामदार यांनी केले .
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Post a Comment
0 Comments