शाळांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या बबत गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी मार्गदर्शन करावे... वायंगणी ग्रामस्थांची मागणी
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याचा डाटा नियमानुसार कोणाच्या ताब्यात रहावा व त्याचे नियंत्रण कोणी करावे याबाबत लेखी मार्गदर्शन व्हावे अशी मागणी वायंगणी गावातील ग्रामस्थांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना' शाळा व्यवस्थापन सामित्यांची मागणी घेणे मासीक सभा याचे नियमानुसार ठराव घेणे कायदेशीर रित्या आवश्यक आहे की नाही तसेच शाळेच्या आवारात नेमके कुठल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच शाळेच्या आवारातील स्वच्छतागृह व त्या ठिकाणी वावरणाऱ्या अल्पवयीन मुलींची सुरक्षितता आधी गंभीर बाबीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ले यांचे कडे उपस्थित ग्रामस्थांनी चर्चा करून प्रशासनाने त्याबाबत आपल्याला लेखी मार्गदर्शन द्यावे अशी मागणी केलेली आहे यावेळी शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष सुमन कामत, सुनील नाईक, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, भालचंद्र सातारकर, भिकाजी गावडे, प्रवीण राजापूरकर, ओंकार पंडित, दाजी नाईक आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments