Type Here to Get Search Results !

होडावडे ख्रिचनवाडी येथील 23 वर्षीय अँथोनी डिसोझा या युवकाची गळफास लावून आत्महत्या


होडावडे ख्रिचनवाडी येथील 23 वर्षीय अँथोनी डिसोझा या युवकाची गळफास लावून आत्महत्या

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे ख्रिचनवाडी येथील येथील अँथोनी डिसोझा या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना काल रात्री केली 11च्या दरम्यान उघडकीस आली . अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात आले. त्यावेळी होडावडे गावातील लोकांनी त्याच्या मित्रांनी रुग्णालया मध्ये मोठी गर्दी केली होती.
अँथोनी यांनी आत्महत्या का केली हे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत असून लवकरच आत्महतेच 
कारणं स्पष्ट होणारं आहे. त्याच्या पश्चात आई- वडील, एक विवाहित बहीण व एक अविवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण होडावडे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments