ग्राहकांच्या सहकार्यामुळे आपण चांगले काम करू शकलो... शेतकऱ्यांचे प्रेम आपण विसरू शकत नाही.. गौरव झोरे
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ले शाखेतील कर्मचारी गौरव हरिभाऊ झोरे हे 2019 पासून बँकेत कार्यरत असताना शेतकऱ्यांची शेती कर्जे ,पिक विमा आदी कामे करत असताना वेळोवेळी शेतकऱ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल वायंगणी येथील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या नुकत्यात झालेल्या बदलीच्या निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू दऊन सन्मान करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बँक ऑफ इंडियाच्या शाखा वेंगुर्ला येथे झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बँक ऑफ इंडिया वेंगुर्ला शाखेचे शाखा अधिकारी फाल्गुनी मिश्रा, शेतकरी भालचंद्र सातार्डेकर, सुनील नाईक, भिकाजी गावडे , समीर केळुसकर, योगेश तांडेल, सत्यवान दुतोंडकर, दाजी नाईक , बँक कर्मचारी प्रतीक अवस्थी,प्रीती चव्हाण,जितेश नाईक
,अभय खानोलकर,शिवप्रिया ,जयेश मांजरेकर ,रुपेश कदम ,सद्गुरू परब ,केतन पालवे आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments