वेंगुर्ला तालुक्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा; शेतकऱ्यांना मोठा फटका
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध असले तरी अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याची स्थिती आहे.
यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे पंप तसेच ट्रॅक्टर चालविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर तुळस येथील शेतकरी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार वेंगुर्ला यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पेट्रोल व डिझेलचा नियमित पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
लवकरात लवकर यावर उपाययोजना न झाल्यास शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी उपस्थित तुळस सोसायटी चेयरमन संतोष शेटकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, शेतकरी संघटनेचे तुषार राय मेघश्याम भगत उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments