Type Here to Get Search Results !

तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव....


तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव....
 
नवप्रभात NEWS / कुडाळ 

कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिर (बोंडागाळवी) येथे, दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
रोज रात्री ८ वाजता नाटक सुरू होणार आहे.
 कार्यक्रम पुढीलप्रमाणे- 
२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळा (मोरे) चे 'साक्षात्कार' नाटक,
 ३० रोजी चेंदवणकर दशावतार मंडळा (चेंदवण) चे 'कंदुकेश्वर लिंग स्थापना' नाटक,
 ३१ रोजी हेळेकर दशावतार मंडळा (कारिवडे) चे 'गणबिंदू घुबड' नाटक, 
१ एप्रिल रोजी बाल दशावतार मंडळा (माड्याचीवाडी) चे 'मायाजाल' नाटक,
 २ रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म, (कीर्तनकार रमेश प्रभू) यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार मंडळा (तेंडोली)
चे ट्रिकसीनयुक्त 'अयोध्याधीश श्रीराम' नाटक होणार आहे.
 उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळा (तेंडोली) च्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments