नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
पाट हायस्कूल ला सामाजिक वनीकरणच्या विविध उपक्रमामुळे यावर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला . पाट हास्कूलमध्ये इको क्लब . हरित सेना सामाजिक वनीकरण या विविध संस्थामार्फत घेतलेले उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात . आणि मुलांमध्ये वन संवर्धन वन जागृती निर्माण केली जाते . याचाच एक भाग म्हणून विविध चित्रफिती दाखवून समुद्र कासव जतन करणे त्याचप्रमाणे कांदळ वनांचे जतन करणे स्वीप्ट पक्षांची तस्करी रोखणे अशा उपक्रमांचा माहिती पट दाखविण्यात आले .यावेळी
परिमंडळ वनअधिकारी (कांदळवन) वेंगुर्ला श्री. सुनिल प्रकाश सावंत, प्रकल्प समन्वयक जागृती गवंडे, दिगंबर तोरस्कर, सौरभ राऊळ, वेदिका चव्हाणउपस्थित होते तर
वनविभागा मार्फत चित्रकला स्पर्धा . घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते . त्याबाबतही माहिती देण्यात आली. इको क्लब आणि हरित सेना हा उपक्रम संदीप साळसकर हे संभाळत असून या माध्यमातून विविध चित्र फित दाखविणे विविध स्पर्धेचं आयोजन केले जाते
पक्षी निरीक्षण कांदळवन सफारी वृक्ष लागवड वृक्ष वाटप वृक्षदिंडी अशा उपक्रमातून मुलांनाही सहभागी करून घेतले जाते या विविध उपक्रमांचे वन अधिकारी यांनी कौतुक केले . एस . के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट . संस्था तसेच मुख्याध्यापक तानाजी काळे पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांचे उत्तम सहकार्य लाभते .
Post a Comment
0 Comments