Type Here to Get Search Results !

बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मात्र दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलनाचा इशारा....

बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मात्र दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलनाचा इशारा....

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ला 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावातून जाणाऱ्या रेडी रेवस सागरी महामार्गावरील म्हापण बाजारपेठ ते वेंगुर्ला या दरम्यानचा रस्ता मागील दोन वर्षांपासून अतिशय नादुरुस्त झाला असून त्यावरून प्रवास करणे त्रासदाय व धोकादायक बनले आहे.या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती (डांबरीकरण)करण्यात यावे.यासाठी म्हापण गावचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, जगदीश म्हापणकर, रघुनाथ जुवाटकर, चंद्रकांत घाडी, संजोग परब व म्हापण ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत पुढील पंधरा दिवसांत रस्त्याचे काम न झाल्यास १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ग्रामस्थ व सर्वपक्षीयाच्या वतीने म्हापण माळरानावर केळूस सीमेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सावंतवाडी,तसेच उप अभियंता , सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ले यांना १३ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले होते.
सदर रस्त्याच्या दुरवस्थे संबंधित १ मार्च पासून काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
या म्हापण ते वेंगुर्ले सागरी महामार्गाच्या डांबरीकरण संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत १ मार्च रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात यावे तसेच येत्या १० मार्च पासून रस्त्याच्या दुरुस्ती (डांबरीकरण )कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्लेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शिंदे यांनी म्हापण ग्रामपंचायत येथे दिले . यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागचे आडोळे,म्हापण माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ, जगदीश म्हापणकर, रघुनाथ जुवाटकर उपस्थित होते. यावेळी सदर पत्रातून आपण दिलेल्या १० मार्चला रस्त्याचे काम सुरू करण्याच्या आश्वासनावर सदरचे आंदोलन मागे घेत असून आश्वासन देण्यात आलेल्या तारखेपासून रस्त्याचे काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करण्यात येईल असे म्हापण माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

0 Comments