निसर्गाचा चमत्कार एकाच काजूच्या बोंडाला चार काजू......
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
एकाच काजूच्या बोंडाला चार काजू लागणे हे अत्यंत दुर्मिळ आणि निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल. असाच चमत्कार पाहायला मिळला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या आंदूर्ले आवेरे गावामध्ये येथील शेतकरी आनंद लवू नागोळकर यांच्या काजूच्या बागेमध्ये एकाच काजूच्या बोंडाला चार काजू लागल्याचे आढळून आले आहे.
सामान्यतः, एका काजू बोंडूला एकच काजू बी असते परंतु या अगोदर एकाच काजूच्या बोंडाला दोन काजू आल्याचे पाहण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे परंतु आता चक्क एकाच काजूच्या बोंडाला चार काजू लागणे हे अत्यंत दुर्मिळ व निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.
निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकांनी अवेरे येथील शेतकरी आनंद लवू नागोळकर यांच्या घरी भेट देऊन एकाच काजूच्या बोर्डाला लागलेल्या चार काजू च्या रूपाने निसर्गाचा चमत्कार पाहिला आहे.
Post a Comment
0 Comments