Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स का पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर..

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स का पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर...

नवप्रभात  NEWS / सिंधुदुर्ग

 "मराठी भाषा गौरव दिनाचे" औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने जिल्ह्यातील मराठी अध्यापकांना देण्यात येणारे उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा जिल्हा स्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार केळुस येथील स का पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक शैलेश शांताराम तांबे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक मराठी अध्यापक असे आठ तालुकास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण पुस्तक दिनाचे औचित्य २३ एप्रिल रोजी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथे मराठी भाषेचे तज्ञ शिक्षक श्रीकांत नाईक (गडहिंग्लज) आदी मान्यवरांच्याहस्ते वितरण केले जाणार आहे.

यावेळी जाहीर करण्यात आलेले तालुकास्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक पुरस्कार पुढीलप्रमाणे सावंतवाडी मयुरी मंगेश कदम कळसूलकर हायस्कूल (सावंतवाडी), कुडाळ - आनंद कदम माणगाव हायस्कूल (माणगाव), दोडामार्ग - सागर लक्ष्मण डेगवेकर सरस्वती विद्या मंदिर (कुडासे), वेंगुर्ला - विजय ठाकर अणसुरपाल हायस्कूल (अणसुरपाल), कणकवली - स्नेहल सागर राणे शंकर महादेव विद्यालय (कुंभवडे), मालवण महेश आत्माराम धामापूरकर अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल (मालवण), वैभववाडी - सत्तापा कृष्णा पाटील यशवंतराव चव्हाण विद्यालय (आचिर्णे), देवगड - बाळासाहेब वामन ढेरे

Post a Comment

0 Comments