महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत मालवण येथे रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने डॉ. सुधीर देशपांडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती जे पाटील ३रे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांची मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दिनांक १८.०२.२०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी आकाशवाणी सिंधुदुर्ग एफ एम 103.6 मेगाहर्टझ / NewsOnAir अॅपवर प्रसारीत केली जाणार आहे.
ही मुलाखत अॅड. श्रीमती प्रणिता कोटकर राऊळ यांनी घेतली आहे.
Post a Comment
0 Comments