राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत आडेली नं १ या शाळेचे यश.....महाराष्ट्र राज्यपालाच्या हस्ते होणार सन्मान
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
राज्य प्रशिक्षण केंद्र सोनतळी जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं.१ तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग च्या भगतसिंग स्काऊट पथकाने यश मिळवले. शाळेचे उपक्रमशील व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्काऊट मास्टर श्री सिताराम लांबर यांच्या मार्गदर्शनाखाली आडेली नं .१ च्या भगतसिंग स्काऊट पथकातील विद्यार्थी कु . तन्मय किरण अवसरे व कु .भालचंद्र भिसाजी आगलावे यांनी राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी यशस्वीपणे पूर्ण करून परीक्षेत यश मिळवले . सदर विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. हे विद्यार्थी सध्या कै .काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत .
राज्य पुरस्कार चाचणीमध्ये यश मिळवल्याबद्दल आडेली गावचे सरपंच सौ यशस्वी कोंडसकर मॅडम,उपसरपंच माननीय श्री परेश हळणकर शाळा आडेली नं.१ एक चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री उदय आडेलकर ,उपाध्यक्ष श्री रविंद्र धर्णे, शिक्षण तज्ञ श्री राजेश सामंत, माजी सैनिक श्री देऊ धर्णे , आडेली सोसायटी चेअरमन श्री प्रकाश गडेकर, वेतोरा शिक्षण प्रसारक समितीचे चेअरमन श्री दिगंबरभाई नाईक,शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामचंद्र कोनकर सर, वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री संतोष गोसावी सर, आडेली नं १ शाळेचे मुख्याध्यापक श्री कर्पूरगौर जाधव सर,आडेली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुनील जाधव सर , मठ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महादेव आव्हाड सर, आडेली गावातील ग्रामस्थ व पालकांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments