Type Here to Get Search Results !

केळूस येथील स.का पाटील विद्यामंदिर आणि अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. विद्या प्रभू यांचे निधन

केळूस येथील स.का पाटील विद्यामंदिर आणि अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. विद्या प्रभू यांचे निधन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील स.का पाटील विद्यामंदिर आणि अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. विद्या(जया) विनायक प्रभू (६६) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि.१७ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 त्यांच्या पश्चात पती, मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या लोकप्रिय होत्या. शिक्षिके पेक्षा पालकाच्या दृष्टीने मुलांना हाताळणाऱ्या प्रभू मॅडम परुळे आणि केळुस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ज्ञान देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरच्या शिक्षिका असे वाटत. विद्या(जया) सामंत प्रभू यांचा जन्म परूळे कुशेवाडा येथील सामंत घराण्यात १४ ऑक्टोबर १९६० रोजी झाला. वडील पाट स्कूलमध्ये शिक्षक असल्याने त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षकी पेशामध्ये आपले कार्य सुरू केले. विवाहानंतर त्या कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील रहिवासी झाल्या. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील आवडती शिक्षिका म्हणून अल्प कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेसे केले स.का पाटील विद्या मंदिर केळूसचे माजी मुख्यध्यापक विनायक प्रभू यांच्या त्या पत्नी होत.

Post a Comment

0 Comments