भाजपा नवनिर्वाचित सदस्यांनी विजयानंतर घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची सदिच्छा भेट!
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, सावंतवाडीचे भाजप युवा नेते श्री. विशाल परब,उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य श्री. संदीप गावडे, पं.स. सदस्य श्री. गौरव मुळीक, युवा नेते , संघटक श्री. विनोद राऊळ,समीर नेमळेकर आणि यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. मनापासून सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जनसेवेच्या मार्गावरील यशस्वी वाटचालीसाठी आपण सर्वांनी एकत्र वाटचाल करू आणि भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक तळागाळातील जनतेच्या सेवेतून अधिक उज्वल करू, असे यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र जी चव्हाण म्हणाले.
Post a Comment
0 Comments