Type Here to Get Search Results !

सुरंगपाणी केंद्र शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्यापासून.....

सुरंगपाणी केंद्र शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्यापासून.....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 
गुरुवार दि १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी, ता-वेंगुर्ला जि-सिंधुदुर्ग या शाळेचा शाळा इमारत उद्घाटन सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा तसेच प्रतिवर्षाप्रमाणे शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३.०० वा.श्री देवी सरस्वती याग कार्यक्रम संपन्न होईल.
दुसऱ्या दिवशी दि. १३ फेब्रुवारी २०२६ स. ११.०० ते दु. ३ या वेळेत शाळा नूतन वास्तू उद्घाटन,संस्थापिका कै. चंपूताई वायंगणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण,
पारितोषिक वितरण सोहळा,माजी शिक्षक सन्मान सोहळा,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व स्नेहभोजन असा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होईल तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शामल मांजरेकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित कोरगांवकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments