बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात गुरुवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिसवांदचे आयोजन.....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात येत्या गुरुवारी, दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: अंमलबजावणी आणि आव्हाने " या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसवांदचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबाजवणी सेल अंतर्गत सदर परिसवांदचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसवांदचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते सकाळी ठीक 9:30 वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे संपन्न होईल. यावेळी संस्थेच्या चेअरमन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मंजिरी अजितराव मोरे, पेट्रोन कौन्सिल मेंबर श्री दौलतरावं देसाई, संस्था कौन्सिल सदस्या मा.श्रीमती अंजली देसाई, संस्था प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी.गोस्वामी, उच्च व तंत्र शिक्षण कोकण विभाग,पनवेल येथील सहसंचालक डॉ किरणकुमार बोंदर, सारस्वत कॉलेज मापूसा गोवा येथील प्राचार्य डॉ. संतोष पाटकर, विषय परिसवांद मार्गदर्शक डॉ. रेखा जाधव, विभाग प्रमुख प्रणिशास्त्र विभाग, के व्ही एन. नाईक महाविद्यालय नाशिक, परिसवांद समन्वयक प्रा. डी. बी. राणे, सहसमन्वयक प्रा. बी. एम.भैरट व इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संम्पन्न होणार आहे. सदर सदर राष्ट्रीय परिसंवादात देशभरातील संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत.
तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वैचारिक सत्र:
परिषदेच्या पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून प्राचार्य डॉ.संतोष पाटकर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात सहसंचालक डॉ. किरण कुमार बोंदर आणि तिसऱ्या सत्रामध्ये डॉ. रेखा जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
समारोप आणि सहभाग
दिवसभर चालणाऱ्या या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप सारस्वत कॉलेज मापुसा गोवा येथील प्राचार्य डॉ. संतोष पाटकर व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
सदर राष्ट्रीय परिसंवाद बहुविद्याशाखीय असल्यामुळे देशभरातील विविध विद्याशाखेतील नामवंत संशोधक अभ्यासक प्राध्यापक व विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत.
या राष्ट्रीय परिसंवादाची माहिती समन्वयक प्रा.डी. बी राणे, सह समन्वयक प्रा. बी.एम.भैरट, प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोसावी यांनी दिली असून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सदर परिसंवादाचा लाभ घेण्याचे आव्हान महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments