कुडाळ येथील माजी प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री दत्तात्रय प्रभु यांचे निधन
कुडाळ येथील माजी प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री दत्तात्रय प्रभु (वय ७६) यांचे ,रविवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले.
प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांनी जिल्ह्यातील ब-याच प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवा दिली.
विद्यार्थ्यांमध्ये त्या प्रिय होत्या. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै.द.ना.प्रभु हे त्यांचे पती होत. त्यांच्या समवेत त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला.
गेले काही दिवस त्याची प्रकृती स्थिर नव्हती. रविवारी सकाळी कुडाळ येथे त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात, तीन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
ओरोस येथील प्रसिद्ध वकील वर्षा प्रभु , सौ.सावनी संदेश तायशेटे, यांच्या त्या मातोश्री होत.
पाट पडताची वाडी (ता.कुडाळ) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
Post a Comment
0 Comments