Type Here to Get Search Results !

मेरा युवा भारत अंतर्गत वेंगुर्ला तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन....स्पर्धांतील विजेते खेळाडू व संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी


मेरा युवा भारत अंतर्गत वेंगुर्ला तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन....स्पर्धांतील विजेते खेळाडू व संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

   युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत “स्वस्थ राष्ट्र – समृद्ध राष्ट्र” या संकल्पनेला बळ देण्यासाठी वेंगुर्ला तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील क्रीडांगणावर संपन्न होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धा वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस तसेच जिमखाना विभाग, कनिष्ठ महाविद्यालय आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात येत आहेत.
स्पर्धांमध्ये मुलांसाठी कबड्डी, मुलींसाठी खो-खो तसेच मुलगे व मुली दोघांसाठी वैयक्तिक स्तरावर १०० मीटर धावणे आणि गोळा फेक या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. त्यासाठी खेळाडूंची जन्मतारीख ०८ फेब्रुवारी २०१२ ते ०८ फेब्रुवारी १९९७ दरम्यान असणे आवश्यक आहे. वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या क्रीडा स्पर्धेमुळे युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, संघभावना आणि शिस्त यांचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून मेरा युवा भारत उपक्रमाच्या उद्दिष्टांना चालना मिळणार आहे. स्पर्धांतील विजेते खेळाडू व संघांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वेंगुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी आधारकार्ड आणणे अत्यावशक आहे.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
कबड्डी (मुलांची)
प्रथम क्रमांक – ₹ २५०० रोख, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹ १५०० रोख, चषक व प्रमाणपत्र
खो-खो (मुलींची)
प्रथम क्रमांक – ₹ २००० रोख, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹ १००० रोख, चषक व प्रमाणपत्र
१०० मीटर धावणे व गोळा फेक (मुलगे व मुली)
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक – चषक व प्रमाणपत्र
सदर स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी डॉ. सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) तसेच हेमंत गावडे (मो. ९४२१२३५१२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर तसेच खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments