पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के .
नवप्रभात NEWS / कुडाळ
एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे . एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता . एलिमेंटरी .साठी 58 विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त झाली .धनिशा निलेश परब आणि विघ्नेश भगवान खोत यांना ए श्रेणी मिळालेली आहे . तर इंटरमिजिएट मध्ये दहा विद्यार्थी बी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर अंतरा प्रवीण केरकर . धनदा वैभव सावंत . दिशा श्रीकृष्ण सामंत . जागृती ज्ञानेश्वर राऊळ कल्पित हेमंत परब .मिहीर विजय मिस्त्री . स्वरांगी सच्चिदानंद सर्वेकर ' यांनी ए श्रेणी प्राप्त केली . या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री संदीप साळस्कर यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक श्री राजन हंजनकर .पर्यवेक्षक सयाजी बोंदर कलाशिक्षक संदीप साळसकर . गुरुनाथ केरकर .जान्हवी पडते आणि दीपिका सामंत यांच्या हस्ते गुलापुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले .पाट हायस्कूलमध्ये विविध कलाविषयक उपक्रम घेतले जातात . त्यामध्ये ही हे विद्यार्थी सहभागी असतात एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेमुळे कलाविषयक विविध क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते .त्यामुळे विद्यालयातील बरेच विद्यार्थी पुढे करिअर साठी कला हा विषय निवडतात . आणि राज्यभरातील विविध आर्ट कॉलेजमधून आपल्या कलागुणांना विकसित करतात . या सर्वांचे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे .
Post a Comment
0 Comments