आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातुन भाजपा चे बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत धुरी यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , उभादांडा जि.प.मतदार संघाचे उमेदवार मनवेल फर्नांडिस , नगरसेविका गौरी मराठे , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , बुथप्रमुख नामदेव सरमळकर , संजय मळगावकर , आनंद मेस्त्री , शैलेश नार्वेकर , सिताराम साळगावकर (बबी) , ग्रा.पं.सदस्य राकेश धुरी , संतोष सावंत , मारुती दोडशानट्टी , अर्जुन तांडेल , प्रितम सावंत , संदेश धुरी , सिरिल आल्मेडा , अरॉन फर्नांडिस , इनासिन फर्नांडिस , देवेंद्र डिचोलकर उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments