Type Here to Get Search Results !

वायंगणी येथील श्री.देव डोंब देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव ७ डिसेंबर रोजी होणार संपन्न


वायंगणी येथील श्री.देव डोंब देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव ७ डिसेंबर रोजी होणार संपन्न

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील श्री.देव डोंब देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव  रविवार ७ डिसेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार संपन्न होणार आहे.

या दिवशी सकाळी श्री देव डोम देवस्थानाचे पारंपरिक पद्धतीने पूजन होऊन कार्यक्रमास प्रारंभ होईल त्यानंतर सकाळी ठिक ९.०० वाजता श्री देव सत्यनारायण महापूजा. दुपारी ठिक १.०० ते ३.३० पर्यंत आरती व महाप्रसाद. सायं. ठिक ६.०० ते ८.०० पर्यंत स्थानिक महिला पुरस्कृत सखी महिला फुगडी ग्रुप फातरवाडी, तुळस यांचा फुगडी चा कार्यक्रम होणार आहे.
 रात्री ठिक ८.०० वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजनाचे कार्यक्रम होतील त्यानंतर रात्रौ ठिक १.०० वाजता श्री. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. देव डोंब देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments