वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे पाठांतर स्पर्धेचे आयोजन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले नगर वाचनालय वेंगुर्लातर्फे शनिवार २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता स्व. पंडित जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित केली आहे. प्राथमिक गट पाचवी ते सातवीसाठी मनाच्या श्लोकातील १ ते १५ श्लोक तर माध्यमिक इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा १ ते १५ ओव्या म्हणावयाच्या आहेत. या स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ३००, २५०, २०० आणि १२५ ची दोन अशी बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित असून मंगळवार, २३ डिसेंबरपर्यंत मुख्याध्यापक, पालक वा विद्यार्थी यांनी नावे संस्थेच्या कार्यालयात पाठवावी. अधिक माहितीसाठी ८२७५६६७०९० या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments