Type Here to Get Search Results !

वेतोरे पालकरवाडी येथे पाच फूट लांबीच्या मगरीला सुरक्षित रेस्क्यू करून सोडले नैसर्गिक अधिवासात

वेतोरे पालकरवाडी येथे पाच फूट लांबीच्या मगरीला सुरक्षित रेस्क्यू करून सोडले नैसर्गिक अधिवासात

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

 वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील दिपक लवू करगुटकर यांचे विहिरीत आढलेल्या 5 फूट लांबीच्या मगरीला सुरक्षित रेस्क्यू करून वैद्यकीय अधिकारी यांचे पाहणी नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सदरची कारवाई मा. उप वनसंरक्षक सावंतवाडी श्री. मिलिश दत्त शर्मा, डॉ. सुनील लाड, सहायक वनसंरक्षक, श्री. संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ यांचे मार्गदर्शनात रेस्क्यू टीम सदस्य अनिल गावडे, वैभव अमृसकर, प्रसाद गावडे, दिवाकर बांबर्डेकर व वनपाल मठ सावळा कांबळे यांनी पार पाडली
यावेळी पालकरवाडी सरपंच श्री बंड्या पाटील., ग्रामस्थ सचिन गवंडी, बाबू गावडे, भिकाजीं कलगुंटकर, दीपक कलगुटकर, भास्कर चुडजी, प्रकाश कलगुंटकर यांनी सदर ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments