Type Here to Get Search Results !

दिव्यांग सप्ताहा निमित्त मालवण येथे 'समावेशकतेचा संदेश' देणारी भव्य प्रभातफेरी संपन्न


दिव्यांग सप्ताहा निमित्त मालवण येथे 'समावेशकतेचा संदेश' देणारी भव्य प्रभातफेरी संपन्न

नवप्रभात NEWS/ मालवण

मालवण येथे दिव्यांग सप्ताहाचे (Disability Week) औचित्य साधून गट साधन केंद्र (BRC) मालवण आणि टोपीवाला हायस्कूल, मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने मालवण शहरात 'समावेशकतेचा संदेश' देणाऱ्या भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून समाजात दिव्यांग व्यक्तींबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि त्यांच्या समान हक्कांचा पुरस्कार करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.
 
या महत्त्वपूर्ण प्रभातफेरीला मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने सर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभातफेरी यशस्वी करण्यात आली.
तसेच, कार्यक्रमासाठी मालवण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. पारकर सर, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक वळंजू सर शाळेच्या शिक्षिका श्रीमती नूरजहान नाईक आदी उपस्थित होते.

गट साधन केंद्र, मालवण येथील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये विषय तज्ञ म्हणून श्रीमती आरती कांबळे आणि श्रीमती गौरीशंकर नार्वेकर उपस्थित होत्या.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेले विशेष शिक्षक श्री. विकास रुपनर, श्री. स्वप्निल पाटणे, श्री. भाऊराव गायकवाड, श्री. हनुमंत तावडे आणि श्री. महेश चव्हाण यांनी प्रभातफेरीत दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेऊन त्यांचे मनोबल वाढवले.
गट साधन केंद्राचे वरिष्ठ सहाय्यक श्री. वैभव वाघाटे, श्री. रेनॉल्ट सर, आणि श्री. अंकुश कनेरकर सर यांनीही उपस्थित राहून उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.

सकाळच्या वेळी निघालेल्या या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. या फलकांवर 'दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, संधी द्या', 'समानता आमचा हक्क', 'समावेशक शिक्षण सर्वांसाठी' अशा आशयाचे संदेश होते. प्रभातफेरीने मालवण शहरातून फिरून सर्वसामान्य जनतेला दिव्यांगांच्या क्षमता आणि त्यांच्या गरजांविषयी जागृत केले.
गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने  यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे आपले कर्तव्य आहे. अशा उपक्रमातूनच समाजात सकारात्मक बदल घडून येतो."
टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेऊन दिव्यांगांप्रती आपला आदर व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments