Type Here to Get Search Results !

तुळस येथे २५ डिसेंबर रोजी वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर व आरती गायन स्पर्धेचे आयोजन


तुळस येथे २५ डिसेंबर रोजी वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर व आरती गायन स्पर्धेचे आयोजन 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे अश्वमेध तुळस महोत्सव निमित्त वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ रोजी विविध सांस्कृतिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सलग १२ वर्षे अखंड सुरू असलेली ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक जडणघडीत महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्व स्पर्धा श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे सकाळी ९.३० वाजता सुरू होतील.
       विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्य, संस्कार, सामूहिक कला व अध्यात्मिक जाण वाढवण्यासाठी या तीनही स्पर्धा—वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर आणि आरती गायन—अत्यंत आकर्षक ठरणार आहेत.

   *खुली शालेय वक्तृत्व स्पर्धा*
वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे.
७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी “सुसंस्कार – यशाचे रहस्य” हा विषय, तर ८वी ते १०वी गटासाठी “राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” हा आदर्शदायी विषय ठेवण्यात आला आहे.
स्पर्धकांच्या वेळेची मर्यादा अनुक्रमे ५ ते ६ मिनिटे आणि ६ ते ७ मिनिटे अशी ठेवण्यात आली आहे. दोन्ही गटातील विजेत्यांसाठी अनुक्रमे ₹७७७, ₹६६६, ₹५५५,उत्तेजनार्थ प्रथम ₹३३३, उत्तेजनार्थ द्वितीय ₹ २२२ अशी पुरस्काररचना असून विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

*स्तोत्र पाठांतर स्पर्धा*
अध्यात्मिक मूल्यांची जपणूक आणि शुद्ध उच्चारांसह स्तोत्रांच्या अभ्यासाची आवड रुजवण्यासाठी स्तोत्र पाठांतर स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ही स्पर्धा दोन गटांत आयोजित केली आहे:
*लहान गट – इयत्ता २रीपर्यंत:* संस्कृत श्री गणपती स्तोत्र
*मोठा गट – इयत्ता ३री ते ४थी:*
 श्री मारुती स्तोत्र
दोन्ही गटांसाठी समान पारितोषिक रचना समान ठेवण्यात आली आहे—₹५५५, ₹४४४, ₹३३३, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹२२२. विजेत्यांना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

*आरती गायन स्पर्धा*
आरती गायन स्पर्धेत इयत्ता १ली ते ४थीतील एकाच शाळेतील चार विद्यार्थ्यांचा संघ सहभागी होऊ शकेल. स्पर्धकांनी कोणत्याही दोन आरत्या सलग सादर कराव्या. वाद्यात फक्त टाळ, झांज किंवा टाळ्याच वापरण्याची परवानगी आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम ₹१०००, द्वितीय ₹७००, तृतीय ₹५०० तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹२५० आणि प्रत्येकी चषक आणि प्रमाणपत्र ठेवण्यात आली आहे.
         सर्व स्पर्धकांनी शाळेचे ओळखपत्र किंवा शाळेकडून मिळालेलं शिफारसपत्र अनिवार्यपणे आणणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क: (वक्तृत्व)विधी नाईक ८८०५७९४२८५ व (स्तोत्र पाठांतर) सानिया वराडकर ८६९८६९२६२३
(आरती गायन) महेश राऊळ ९४०५९३३९१२
 तरी वरील सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले केले आहे.

Post a Comment

0 Comments