बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात जीवाश्म व देवराई संवर्धन या विषयावर परिसंवादाचे आयोजन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्री विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने 'प्राचीन जीवाश्म व देवराई संवर्धन' या विषयावर एक दिवसीय परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैलीमध्ये प्राचीन जीवाश्म आणि देवराई या किती महत्त्वाच्या आहेत व त्यांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. धनश्री पाटील यांनी केले.
सदरील कार्यक्रम तीन सत्रांमध्ये विभागला गेला होता. प्रथम सत्राच्या मार्गदर्शनासाठी लाभलेले अतिथी डॉ.अजित वर्तक यांनी वनस्पती ,प्राणी, जीवाश्मे यांचा अभ्यास केल्यास त्यातून नवीन ज्ञानाची उत्पत्ती होते. संशोधनात्मक अभ्यासासाठी प्राचीन व दुर्मिळ जीवाश्मनचा त्याचबरोबर ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे प्राचीन शिल्पे, वनस्पती, प्राणी यांचा ऐतिहासिक वारसा जतन करणे हे पुढील संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याचबरोबर ते पुढे म्हणाले की, पोस्टल तिकिटे जतन केल्यास देशाचा ऐतिहासिक वारसा समजला जाऊ शकतो असे मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्राच्या प्रमुख अतिथी डॉ.अनुराधा उपाध्ये यांनी पर्वतीय भागावर फुलणारे हिरवेगार पाचूचे जंगल हे तेथील स्थानिक लोकांच्या माध्यमातून अबाधित ठेवले जाते. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1492 प्रकारच्या विविध आणि दुर्मिळ अशा देवराई आढळतात याची माहिती दिली. नैसर्गिक संसाधनांचे जतन व संवर्धन करत असताना पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलले हे भविष्यातील एक उपाय योजना ठरू शकते याविषयीचे मार्गदर्शन केले.
तृतीय सत्रातील प्रमुख अतिथी डॉ.राजेंद्र केरकर यांनी पर्यावरण पूरक संसाधने यांचा पुन्हसंचय करताना येणाऱ्या आव्हानांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे त्याचबरोबर जनसंवर्धन करण्यासाठी योजना तयार करणे स्थानिकांच्या गरजा समजून घेणे व सरकारी विभागाची परवानगी घेणे इत्यादी बाबी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. धनराज गोस्वामी यांनी निसर्गामध्ये आढळणाऱ्या प्राचीन दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन व जतन करणे का गरजेचे आहे. तसेच आजच्या तरुण पिढीने हा विषय घेऊन यात संशोधन करणे आवश्यक असल्याचे सांगितले देवराईचे संवर्धन करण्यासाठी पारंपारिक ज्ञान व स्थानिक समाजाची ओळख टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. झाडे तोडलेल्या क्षेत्रावर मूळ वनस्पतींच्या प्रजातीची लागवड केल्यास पर्यावरण पूरक पुनर्रचना करणे सोपे होते तसेच निसर्गनिर्मित गोष्टी पासून रोजगार देखील उपलब्ध होतो. असे मत व्यक्त केले
सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्हि.पी. नंदगिरीकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.एस. एच. माने यांनी मानले
Post a Comment
0 Comments