Type Here to Get Search Results !

आडेली येथे दत्तजयंती उत्सव आणि वार्षिक जत्रोत्सवाचे आज आयोजन


आडेली येथे दत्तजयंती उत्सव आणि वार्षिक जत्रोत्सवाचे आज आयोजन 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

   वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पलतडवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर - श्री दत्तात्रय देवस्थान येथे आज गुरुवार 4 डिसेंबर ते शनिवार ६ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. यनिमित्त गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. ते ११ वा.श्री दत्तात्रय पादुकावर अभिषेक,
दुपारी ११ ते २ वा. श्री सत्यनारायण महापूजा,
दुपारी ३ ते ७ वा.महाआरती व तिर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. ग्रामस्थांची भजने.
शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वा.
ग्रामस्थांची भजने.
शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार असून पूजन, केळी ठेवणे, रात्रौ १० वाजता दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी दर्शनासह, धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन 
दत्तात्रय देवस्थान उत्सव कमिटी, आडेली
पलतडवाडी व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments