"पाट हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी "....
नवप्रभात NEWS / कुडाळ
पाट हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेच्या भव्य आयोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. ही स्पर्धा प्रशालेत 28,29,30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणार असल्यामुळे शाळेच्या मैदानावर प्रेक्षक गॅलरी बांधकाम,मुख्य स्टेज बांधणी तसेच प्रशाला सुशोभीकरण या पूर्वतयारीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये संस्था पदाधिकाऱ्यांच्या समवेत प्रशालेतील शिक्षक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अथक प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धा मोठ्या उत्साहात, सुरळीत व निर्विघ्न पार पडावी यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांकडून योग्य ते नियोजन केले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता विद्यार्थी, ग्रामस्थ व सर्व क्रीडाप्रेमींना लागून राहिली आहे.
या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पुरस्कर्ते खालील प्रमाणे पुरुष गट प्रथम क्रमांक 55 हजार रुपये, सचिन देसाई-परुळे, द्वितीय क्रमांक 45000 हजार रुपये मिलिंद कोरडे- उद्योजक,तृतीय क्रमांक 25००० हजार रुपये,कै.रेडकर गुरुजी माजी कार्याध्यक्ष, चतुर्थ क्रमांक 15000 हजार रुपये दीपक पाटकर- संस्था खजिनदार,पुरुष गटातील सर्व आकर्षक चषक कुमार. चित्रांग देवदत्त साळगांवकर,रोख पारितोषिके कै.सुनील म्हापणकर.
महिला गट प्रथम क्रमांक 35000 रुपये, द्वितीय क्रमांक 25000 रुपये, तृतीय क्रमांक 15000 रुपये चतुर्थ क्रमांक 10000 रुपये पुरस्कर्ते कै.गं.लता गोपाळ परुळेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी जीया निलेश परुळेकर पाट -मुंबई, महिला स्पर्धेचे सर्व आकर्षक चषक कुमारी भक्ती योगेश तेली कोचरेकर आणि रोख पारितोषिके कै.सुनील म्हापणकर समरणार्थ दिली आहेत .संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर,राजेश सामंत ,सुधीर मळेकर,हिशोब तपासनीस शरद विष्णू कोनकर,मुख्याध्यापक राजन हंजनकर,संदीप साळसकर,क्रीडा शिक्षक संजय पवार ,सर्व संस्था पदाधिकारी यांनी स्पर्धेच्या नियोजनाची पाहणी केली .सर्व क्रीडा रसिकांनी या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments