सरंबळ - टेंबवाडी येथील रहिवासी आत्माराम शंकर मांजरेकर यांचे निधन
नवप्रभात NEWS / कुडाळ
कुडाळ तालुक्यातील सरंबळ - टेंबवाडी येथील रहिवासी आत्माराम शंकर मांजरेकर (९२) यांचे रविवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सरंबळ परिसरात ते बाबा या टोपण नावाने परिचित होते. झावळ्याच्या केरसुणी बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय टिकाऊ अशा केरसुणी ते बनवायचे, त्यामुळे त्यांच्या केरसुणीला फार मागणी असायची. त्यांना भातशेतीची आवड होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, नातजावई, पणतवंडे असा परिवार आहे. सरंबळ-टेंबवाडी येथील दशरथ मांजरेकर व सत्यवान मांजरेकर यांचे ते वडील होत.
Post a Comment
0 Comments