Type Here to Get Search Results !

हॉस्पिटलचे गाजर दाखविणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील ! ... संजय गावडे


हॉस्पिटलचे गाजर दाखविणाऱ्यांना मतदार धडा शिकवतील ! ... संजय गावडे

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

महाआघाडी सरकारच्या काळात ५० खाटांचे नवीन शासकीय सुसज्र असे उपजिल्हा रुग्णालय तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरू केले आहे. मात्र, त्यानंतर आघाडीची सत्ता गेल्याने सत्तेत आलेल्या भाजप-सेना (शिंदे गट) सरकारने उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले. सत्ताधारी सरकारचे पालकमंत्री व आमदार यांच्याकडे वेंगुर्लेवासीयांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. अन आज निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी प्रचार करताना पालकमंत्री नीतेश राणे आरोग्य सेवेसाठी जनतेची दिशाभूल करून सेंट लुक्स  हॉस्पिटल सुरू करतो, अशा खोट्या कल्पना वेंगुर्ले येथे येऊन करीत आहेत त्यामुळे या निवडणुकीत भाजपबरोबरच शिंदे शिवसेनेला जनता जागा दाखवेत, असे परखड मत उबाठा सेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी व्यक्त केले आहे

वेंगुर्ले नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीची केवलवाणी परिस्थिती पाहून किंव वाटते. महायुतीमध्ये तडजोड न झाल्याने सर्वत्र भाजप-शिवसेना यांच्यामध्ये समोरासमोर एकास एक नगराध्यक्ष व नगरसेवक उभे ठाकल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सैरभैर झाले असून वेगूल्यांमध्ये वार्डमध्ये छोट्या छोट्या मिटिंगमध्ये उपस्थित राहताना दिसत आहेत. ज्या पक्षाला संपरिवण्याचा विडा उचलता होता तोच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांना डोईजड वाटत आहे. 
ठाकरे सेनेचे शिवसेनेच्या कट्टर मतदारामुळे आपली हार निधित आहे, हे लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ल येथे असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल पुन्हा सेवेसाठी सज्ज होणार, असे आश्वासन त्यानी वेंगुर्लेवासीयांना देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

वेंगुर्ल्यातील रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर सर्जन डॉक्टर, ऑथॉपिडीशियन डॉक्टर, फिजिशियन डॉक्टर, सोनोग्राफी तज्जा, जनरल सोनोग्राफी यांची त्याचबरोबर इतर कर्मचारी यांची भरणा करून वेगुल्यर्त्यातील हॉस्पीटल सुसज्जपणे परिपूर्ण सेवेने सुरू करण्यासाठी मागणी ठाकरे शिवसेना तसेच नागरिकांनी मागणी लावून धरती परंतु आम्हाला केवळ या पालकमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्षित केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

वेंगुर्ल्यामध्ये आज ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय आहे याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक, शल्यचिकित्सक भूलतज्व, अधिपरिचारिका, ओषध निर्माता यासह एकूण १७ पदे रिक्त आहेत सध्याच्या परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालय वेगुर्ला येथे सर्जन, ऑर्थोपेडिशन, फिजिशियन यांची आठवडयातून एकदा तरी त्यांनी उपस्थिती दर्शवावी. त्याचप्रमाणे सोनोग्राफी, फिजिशियन, भुलतज्ञ, डाटा ऑपरेटर, ऑनलाईन काम करणारे यंत्रणांची आवश्यकता आहे तसेच जनरल सोनी एक्स-रे रिपोर्ट हे शासनाने पैसे न भरल्याने ते ऑनलाईन येणे बंद झाले असून सध्या एक्सरे काढल्यानंतर त्याचे रिपोर्ट मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, डायलेसिस मशीन येणे जावश्यक आहे ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक झाले पाहिजे सध्या या ठिकाणी मेडिकल ऑफिसर किरण कुंटे, सत्यम आगलावे, अमोल गबाळे, शुभम धारगळकर स्नेहल सावंत है सर्वजण आपल्या परीने रुग्णांना सेवा देण्याचं कार्य करीत आहे. या वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयासाठीच्या आवश्यक गरजांची पूर्तता केली तर सर्व सोपींनी युक्त हॉस्पिटल पुन्हा एकदा जोमाने चालू होऊन रुग्णांना योग्य ती सेवा मिळेल निवडणुका येतील जातील, परंतु पालकमंत्र्यांना जनतेतील रुग्णांच्या भावनेशी खेळण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करून सेंटलुक्स हॉस्पिटल सुरू करतो, अशा खोट्या वल्गना वेंगुर्ल्यात येऊन करू नयेत, अशी विनंती हात जोडून करीत असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

 चार महिने पगार नाहीत!

वेगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर यांचे ४ महिने पगार झाले नाहीत तसेच प्रसुती गृहातील मातांना देण्यात येणाऱ्या जेवण व नाश्ता पुरविणाऱ्याऱ्यांचे बिल सुद्धा गैले दीड वर्ष दिलेल नाही याकडे पालकमंत्री केव्हा लक्ष देतील का? पगार न मिळल्याने संबंधित डॉक्टरांचे कुटुंबावर परिणाम होऊन ते नोकरी सोडून जातील, असे गावडे म्हणाले

Post a Comment

0 Comments