"पाट हायस्कूलच्या मैदानावर रंगले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे सामने".......
नवप्रभात NEWS / कुडाळ
एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल्. देसाई विद्यालय व कै.सौ. एस्. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय तसेच कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशस्त मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पुरुष व महिला गटातील सर्व साखळी सामने रंगतदार झाले.
स्पर्धेच्या पुरुष गटातील पहिल्या साखळी सामन्यात उत्कर्ष मुंबई उपनगर भांडुप या संघाने इच्छाशक्ती पालघर या संघावर 11 गुणांनी विजय मिळविला. हा सामना अतिशय उत्कंठावर्धक व चुरशीचा झाला. आत्माराम ठाणे या संघाने संघर्ष कोचरा या संघावर 22 गुणांनी विजय मिळविला. स्वस्तिक मुंबई उपनगर या संघाने फोंडा पंचक्रोशी संघावर नऊ गुणांनी विजय मिळविला .उत्कृष्ट चढाईपटूंच्या उत्तम पदलालित्याने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. न्यू सम्राट पुणे या संघाने इच्छाशक्ती पालघर या संघावर केवळ एका गुणाने मात केली. सगळेच संघ तोडीस तोड कबड्डी खेळत होते. सन्मित्र उपनगर या संघाने संघर्ष कोचरा या संघावर सात गुणांनी विजय मिळविला. विजय क्लब मुंबई संघाने प्रकाश तात्या बालवडकर पुणे या संघावर सात गुणांनी विजय मिळविला. फोंडा पंचक्रोशी संघाने अमरज्योत मुंबई उपनगर संघावर 15 गुणांनी विजय मिळविला. स्वामी समर्थ संघाने सिद्धांत क्रीडा मंडळ उपनगर संघावर 17 गुणांनी विजय मिळविला. एकूण पुरुष गटात स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आठ सामने खेळले गेले.
महिला गटातील सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे .........
अनिकेत रत्नागिरी संघाने विश्वशांती मुंबई उपनगर संघावर 42 गुणांनी विजय मिळविला. प्रकाश तात्या बालवडकर पुणे संघाने स्वराज्य रत्नागिरी चिपळूण 32 गुणांनी विजय मिळविला. डॉ. शिरोडकर मुंबई शहर या संघाने आजरा कोल्हापुर या संघावर 44 गुणांनी विजय प्राप्त केला. जय गणेश मालवण संघाने विश्वशांती मुंबई शहर संघावर 28 गुणांनी विजय प्राप्त केला. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब ने एस्. एम्. सिंधू स्पोर्ट्स कुडाळ या संघावर 24 गुणांनी विजय मिळविला .महिला गटातील एकूण पाच सामने पहिल्या दिवशी उत्कंठावर्धक व रंगतदार झाले. माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सर्वसामने व्यवस्थितरित्या पार पडले.
Post a Comment
0 Comments