Type Here to Get Search Results !

अपक्ष उमेदवार योगेश वारंग यांची जोरदार प्रचारास सुरुवात....


अपक्ष उमेदवार योगेश वारंग यांची जोरदार प्रचारास सुरुवात....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला

      वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार ब मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार योगेश वारंग यांनी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा आशीर्वाद घेत प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. यावेळी प्रभागातील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेला तसेच कोणतेही राजकीय पाठबळ नसलेला योगेश वारंग हा युवा चेहरा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी या निवडणुकीत आपली छताचा पंखा ही निशाणी घेऊन प्रभागातील जनतेसमोर जात आहे. या प्रभागातील युवकांचे प्रश्न, प्रभागातील समस्या सहभागृहात मांडण्यासाठी युवा नेतृत्वाला आपण एक संधी द्यावी असे आवाहन यावेळी योगेश वारंग यांनी प्रचारादरम्यान मतदारांना केले आहे.
         वेंगुर्ला ही निसर्गाच समृद्ध देणं लाभलेले आणि जिल्ह्याच्या नकाशावर कलाप्रेमी, सुसंस्कृत, शालीन, शांतता प्रिय समाज अशा वैभवशाली परंपरेचा वारसा लाभलेले भूमी आहे. त्याची प्राणप्रणाने जोपासना करण्यासाठी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, युवा पिढीची सूजनशीलता आणि संघटन कौशल्य एकत्रितपणे उपयोगी पडतील. आपण ज्या भागात राहतो त्या परिसरातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सर्वांच्या सहकार्याने काम करण्याची इच्छा मनात धरून कोणताही राजकीय उद्देश समोर न ठेवता फक्त आणि फक्त समाजसेवा हेच व्रत डोळ्यासमोर ठेवून मी आपल्यासमोर निवडणुकीला सामोरा जात आहे. या प्रभागातील समस्यांची नगरपरिषद सभागृहात केवळ मांडणी न करता ते समूळ सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. या सर्व समस्या सोडवण्या सोबतच लोकसहभाग तसेच नागरिकांच्या सूचनांचा आदर करून विकासात्मक कामे करण्यासाठी मी आग्रही राहीन. माझ्यासारख्या समाजामध्ये समरस होणाऱ्या तरुण नेतृत्वाला जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातून या प्रभागातील मतदारांना केले आहे

Post a Comment

0 Comments