Type Here to Get Search Results !

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात 'भारतीय संविधान दिन' संपन्न

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात 'भारतीय संविधान दिन' संपन्न 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय संविधान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. धनश्री पाटील होत्या तर प्रमुख वक्ते समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एल.बी. नैताम होते.
       या वेळी प्रा.एल.बी. नैताम यांनी भारतीय संविधानाचा ऐतिहासिक प्रवास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान यावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संविधानिक मुलतत्वे जपत असताना आजच्या तरुण पिढीने कर्तव्य आणि जबाबदारी यांचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे.भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ता घोषित केले आहे. नागरिकांना न्याय, समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी महत्त्वाची हमी दिली आहे. असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. डी. एस. पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अमूल्य वारसाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत म्हणून संविधानातील हक्कासोबत कर्तव्यांचे निष्ठेने पालन करणे गरजेचे आहे. आजचा दिवस आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात संवैधानिक मूल्य रुजवत ठेवेल आणि समाजाप्रती कर्तव्यनिष्ठ वृत्ती निर्माण करेल असे मत व्यक्त केले. या वेळी स्वरा गंगावणे ,कादंबरी मस्के, सानिका वरसकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
           या कार्यक्रमास प्रा.जे.वाय.नाईक प्रा.एस.एच.माने,प्रा. सदाशिव चुकेवाड, प्रा व्ही.पी.नंदगिरीकर , प्रा. मनीषा मुजुमदार ,प्रा. व्ही.एम. पाटोळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. बी. राठोड, प्रा. विकास शिंगारे, प्रा. जी.पी.धुरी, व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
           सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. के. आर. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. बी. तोडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. एस. बी.सनगर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments