नाणोस सरपंचावर अविश्वास ठराव १९२ विरुद्ध २२ मतांनी ठराव पास
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील नाणोस गावच्या विद्यमान सरपंच प्राजक्ता शेट्ये यांच्याविरोध आज झालेल्या विशेष ग्रामसभेत एकूण २२० मतांपैकी १९२ जणांनी सरपंचांच्या विरोधात मतदान केले. तर सरपंच शेट्ये यांच्या बाजूने फक्त २२ जणांनी मतदान केले. यातील ६ मते बाद ठरली.
गावातील ग्रामस्थांना, सहकारी सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, असा ठपका ठेऊन ६ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर विशेष ग्रामसभा आयोजित करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
Post a Comment
0 Comments