सिंधुदुर्गात एसटीच्या पहिल्या सीएनजी बसमध्ये झाराप पेट्रोल पंपावर फिलिंग करून शुभारंभ
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटीची पहिली सीएनजी बस झाराप पेट्रोल पंपात फिलिंग करण्यात आली.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. गेल आणि बि.पी.सी.एल. या संयुक्त उपक्रमांतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराची पहिली CNG बस मे. झारप पेट्रोलियम, झारप, कुडाळ येथे फिलिंग करण्यात आली.
गाडी क्र. एम एच २० बी एल- ३९५० असा या बसचा क्रमांक असून ही पहिली सीएनजी बस असल्याने तिची सजावट करण्यात आली.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणारा एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात सीएनजीवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले या तीन आगारांचा समावेश असून या आगारांच्या प्रत्येकी ५० बसेसचे सीएनजीमध्ये परिवर्तन केले जाईल.
तूर्तास खाजगी पंपांवर या बसेसमध्ये सीएनजी भरला जाणार आहे. तसेच लवकरच कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले आगारात स्वमालकीचे पंप उभारले जातील.
झाराप येथे झालेल्या या शुभारंभाच्या वेळी एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच झाराप पेट्रोल पंपाचे कर्मचारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments