Type Here to Get Search Results !

शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी आरवली येथे होणार शिवजयंती साजरी


शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी आरवली येथे होणार शिवजयंती साजरी

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली टांक येथील शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे स्वराज्य रक्षक श्री छन्त्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२५ या दिवसात विविध कार्यक्रमांसह भव्य दिव्य स्वरुपात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात १७ फेब्रुवारी
सकाळी ९ ते १ वाजता रक्तदान शिबीर घेण्यात येईल
दुपारी ३.०० वाजता तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धा होणार आहे
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा,सायं. ५.०० वाजता शिवज्योत रॅली यशवंत गड रेडी ते मारुती मंदिर टांक

१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता
 बाईक रॅली मारुती मंदिर ते शिरोडा त्यानंतर सकाळी ११.०० वाजता शिवमूर्तीपूजन त्यानंतर दुपारी ३.०० वाजता तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा झाल्यावर सायं. ७.०० वाजता जिल्हास्तरीय नित्य स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
आरवली टांक येथील मारुती मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला शिवप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments