Type Here to Get Search Results !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा सीईओ घेणार आढावा.....सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये १७ फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा


पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा सीईओ घेणार आढावा.....सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये १७ फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील आढावा सभांचे नियोजन झाले असून ते पुढील प्रमाणे. 

  17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तर दुपारी 3 वाजता मालवण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाचा ते आढावा घेतील.
 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ तर दुपारी 3 वाजता वेंगुर्ले तालुक्याचा आढावा घेणार आहे. 
20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतील तर दुपारी 3 वाजता देवगड तालुक्याचा आढावा घेणार आहेत. 
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी तालुक्याचा व दुपारी 3 वाजता दोडामार्ग तालुक्याचा आढावा घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments