घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात ७ मार्चला जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील घावनळे-कासमळा ॐ श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार, श्री स्वामी समर्थ मठ, यांच्या वतीने घावनळे येथे शुक्रवार ७ मार्च रोजी सायं. ७ वा. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.
लहान गट (१२ वर्षापर्यंत) प्रथम क्र. ३,००१ रु., द्वितीय २,००१ रू., तृतीय १,००१ रु., चतुर्थ ५०१ रु. व प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. मोठा गट (१२ वर्षांपुढील) प्रथम क्र. ४,००१ रु., द्वितीय ३,००१ रु., तृतीय २,००१ रु., चतुर्थ १,००१ रु., प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मेडल व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २५ फेब्रुवारीपर्यंत आपली नावे व गाणे अमित चव्हाण यांच्याशी संपर्क साधून द्यावीत. स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे - श्री स्वामी समर्थ महाराज, श्री दत्तगुरू, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, देवी जागर, गोंधळ व श्रीराम व श्री मारुती. सादर करावयाच्या गाण्याची मर्यादा कमीत कमी ३ मिनिटे व जास्तीत जास्त ५ मिनिटे असावी, जास्तीत-जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ (घावनळे-कासमळा) च्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments