ईनरव्हिल क्लब कुडाळ, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, आणि देसाई - उपाध्ये - परब मित्र मंडळातर्फे हुमरमळा येथे आरोग्य शिबीर संपन्न
नवप्रभात NEWS
ईनरव्हिल क्लब कुडाळ, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, आणि देसाई - उपाध्ये - परब मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हुमरमळा येथील आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.
हुमरमळा येथील श्री लक्ष्मी नारायण हॉल वर,सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ईनरव्हिल क्लब कुडाळच्या अध्यक्षा सौ.संजना काणेकर, सचिव सौ.वैशाली पडते, पी.ओ.सी. डॉ.सायली प्रभु, तसेच स्त्री रोग तज्ञ डॉ.ऊज्वल विश्वास, डॉ.श्रेयस राऊत, डॉ.समृध्दी कांबळे, डॉ.चैताली प्रभु, आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित रुग्णांच्या विविध तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले.मान्यवरांनी मनोज देसाई मित्र मंडळाचे आभार मानले. सदर शिबीरास, हर्षदा मुननकर, रेश्मा नानचे, अनिता बिबवणेकर, स्नेहा परब हुमरमळा आरोग्य उपकेंद्राच्या श्र ध्दा परब , भा.ज.पाच्या तालुका सदस्य सौ.सोनाली देसाई आदींनी परिश्रम घेतले. व यशस्वी केले.आभार बारीश ऊर्फ ऋषिकेश उपाध्ये यांनी मानले.
Post a Comment
0 Comments