Type Here to Get Search Results !

कणकवली तालुक्यात अंगणवाडीपदांसाठी अर्ज भरण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत


कणकवली तालुक्यात अंगणवाडीपदांसाठी अर्ज भरण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत

नवप्रभात NEWS / कणकवली

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत कणकवली तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील अंगणवाडी सेविका ८ व मदतनीस ५७ पदे भरण्यासाठी १३ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. तालुक्यातील बेर्ले, कुरंगवणे पच्छिम, फोंडा माळवाडी, कसवण नं. २, कासार्डे ब्राह्मणवाडी, कासार्डे वाळुखण, तळेरे रघुचीवाडी, दिगवळे नं. १ याठिकाणी अंगणवाडी सेविकांची रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भिरंवडे परतकाम, कुंभवडे नं. १, कुंभवडे नं. २, बेर्ले, खारेपाटण हसोळटेंब, शेर्पे-तांबळवाडी, साळीस्ते नं. १, साळीस्ते-राबांडेवाडी, ओझरम-मापारवाडी, वाघेरी-कुळाचीवाडी, वाघेरी-मठखुर्द, तळेरे-वाघाचीवाडी, फोंडा नवीन कुर्ली वसाहत, फोंडा-साईनगर, फोंडा-धनगरवाडी, फोंडा-खैराट, फोंडा गडगेसखल, लोरे-बांबरवाडी, घोणसरी नं. ५, नांदगाव-मधलीवाडी, नांदगाव वाघाचीवाडी, डामरे-कानडेवाडी, तिवरे वाळवेवाडी, तिवरे-खालचीवाडी, आयनल-मणेरवाडी, आयनल-गावठण,कोंडये-वरचीवाडी, करुण भोरपीवाडी, हुंबरट-गुरववाडी, सावडाव-काटेवाडी, हुंबरट-अनंतवाडी, सावडाव-खलांतरवाडी, असलदे-तावडेवाडी, माईण-हातणकरवाडी, पिसेकामते-फळसेवाडी, आशिये-खालचीवाडी, कलमठ-कुंभारवाडी, बिडवाडी-करखरे, भरणी-तांबळवाडी, दिगवळे-करंबळी, दिगवळे-बामणदेवाडी, दिगवळे-रांजणवाडी, भिरवंडे-जांभुळभाटले, भिरवंडे-खालंतर, नाटळ धाकटे मोहुळ, नाटळ-कानडेवाडी, सांगवे-तेलंगवाडी, दारिस्ते नं. १ आदी ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

भरती प्रक्रीया सुरू

या पदांसाठी अर्ज भरण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. इच्छुकांनी आपले अर्ज २८ तारखेच्यापूर्वी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कणकवली कार्यालयात सादर करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी उमा हळदवणेकर यांन केले आहे.

Post a Comment

0 Comments